आमच्याबद्दल
कोणे गावाच्या उत्तर दक्षिणेस सह्याद्रीच्या डोंगर रांगेत मौजे कोणे गाव वसलेला असून सदर गावास नाशिक गिरणारे हरसुल रस्त्यावर अगदी मधोमध बसलेला गाव आहे कोणे गावात महादेवाचे दोन मंदिर असून सुंदर अशी पिंड आहे मंदिर परिसरात अतिशय सुंदर वातावरण आहे कोणे गावात इतरही मंदिर असून मारुती मंदिर भैरोबाचे मंदिर गावाला लागूनच आहे गावात पूर्व पश्चिम अशी कशीपी नदी वाहत असून कश्यपी नदीवर एक छोटासा धरण असून धरणाच्या पाण्यावर शेती व पिण्याचे पाण्याचा वापर करण्यात येतो कोणे हा गाव नाशिक शहरापासून40कि.मी. व त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून 20 किमी अंतरावर आहे कोणे हा गाव निसर्गाने म्हटलेला असून गावात नासिक पुणे मुंबई हून पर्यटक येत असतात मौजे कोणे गावात सर्व जातीची धर्माचे लोक असून सर्व लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात त्यामुळे कोणे गावाचा तालुक्यात नावलौकिक आहे
भौगोलिक माहिती
कोणे गावाचा भौगोलिक क्षेत्रफळ.797.60 हे
*लागवडीखालील क्षेत्र.662.00
*वनाखालील क्षेत्र.00.00
*पडित जमीन क्षेत्र.202.80
*पोट खराब क्षेत्र.54.00
*शेतकरी संख्या.450
संस्कृती व चालिरिती
मौजे कोणे गावातील लोक साधे, परिश्रमी व धार्मिक आहेत. गावात महादेव, मारुती व भैरवनाथ मंदिरे असून येथे शिवरात्री, हनुमान जयंती, भैरवनाथ यात्रा, गणेशोत्सव, दिवाळी, होळी असे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. कीर्तन, भजन, दिंडी, पोवाडे या लोककला आजही जतन झालेल्या आहेत. निसर्गप्रेम, आपुलकी आणि परस्पर सहकार्य हीच कोणे गावाची खरी ओळख आहे.
चालिरिती व सामाजिक जीवन
-
लग्नसमारंभ, नामकरण, मुंज इ. समारंभ पारंपरिक रीतिरिवाजांनी पार पाडले जातात.
-
गावात एकोपा, परस्पर साहाय्य व एकत्र येऊन सण साजरे करण्याची परंपरा आहे.
-
वयोवृद्ध लोकांना मान, वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन, आणि एकत्रित कुटुंबसंस्था आजही टिकून आहे.
-
स्त्रिया घरकामासोबत शेती आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात.
आसपासची गावे
मौजे कोणे गावाच्या आसपास खालील गावे आहेत —
ही सर्व गावे सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेली असून नाशिक–हरसूल मार्गावर कोणे गावाच्या जवळ आहेत.